१० जूननंतर मान्सून सक्रिय

0
101

राज्यात १० जूननंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे. पश्‍चिम बंगालच्या उपसागरात ११ जूनला तयार होणार्‍या कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे गोव्यासह अनेक राज्यात १० जूननंतर सलग चार दिवस जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यात ९ जूनपर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.