हॉटेल परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती

0
17

कॉंग्रेसच्या आमदार डिलायला लोबो यांच्या हॉटेलचा परवाना रद्द करण्याचा जो आदेश अन्न व औषध प्रशासनाने घेतला होता, त्याला काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली. या हॉटेलचा परवाना रद्द करण्यासाठीच काहीही ठोस कारण दिसत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाच्या ज्या अटी आहेत, त्यांचे पालन केले जावे, अशी सूचना न्यायालयाने लोबो यांना केली आहे.