गुजरातमधील पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काल कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. गेल्या काही महिन्यांपासून ते पक्षावर नाराज होते. जनता या निर्णयाचे स्वागत करेल याची मला खात्री आहे, असे राजीमान्यानंतर हार्दिक पटेल म्हणाले. हार्दिक पटेल यांनी ट्विटरवर सोनिया गांधींना पत्र लिहून कार्याध्यक्ष पदासह पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. पक्षाचे राजकारण केवळ विरोधापुरते मर्यादित राहिले आहे. देशाला विरोध नकोय, तर त्यांच्या भविष्याचा विचार करणार्या पर्यायाची गरज आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.