हरवळे येथे अपघातात साखळीचा युवक ठार

0
45

प्रतापनगर हरवळे येथे एका दुचाकीला झालेल्या स्वयं अपघातात साखळीतील प्रसाद लक्ष्मीकांत शिरोडकर (३६) हा युवक जागीच ठार झाला. प्रसाद हा घरी पोहोचण्यासाठी ५० मीटर अंतरावर असतानाच सदर अपघात घडला. ही घटना काल मंगळवारी दुपारी २.३० च्या सुमारास घडली. प्रसाद शिरोडकर हा आपल्या दुचाकीने (जीए ०४ सी २६९१) घरी येत असताना वाहनावरील त्याचा ताबा सुटला. त्यामुळे त्याची दुचाकी रस्त्याशेजारील कुंपणाला धडकली. या घटनेत तो जागीच ठार झाला.