स्वयंपूर्ण मित्रांशी पंतप्रधान २३ रोजी साधणार संवाद

0
54

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यातील स्वयंपूर्ण मित्रांशी येत्या २३ ऑक्टोबर रोजी संवाद साधणार आहेत. हा संवाद व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

पंतप्रधानांनी कोविड लशीच्या पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्यानंतर अशाच प्रकारे राज्यातील आरोग्य यंत्रणा आणि कोविड योद्धांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता ते राज्यातील स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधणार आहेत. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत योजनेखाली गोवा सरकार ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना राबवत आहे.

या योजनेअंतर्गत राज्य सरकारने अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी हे येत्या २३ ऑक्टोबर रोजी राज्यातील स्वयंपूर्ण मित्रांशी संवाद साधून त्यांनी वरील योजनेखाली आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती मिळवणार आहेत. त्यांनी केलेल्या कार्याविषयी त्यांचे कौतुकही करणार आहेत, असे भाजपमधील सूत्रांनी स्पष्ट केले.
या संवादाचे थेट प्रक्षेपण राज्यातील जनतेला समाज माध्यमांवरील अकाउंटवरून पाहता येणार आहे.