स्टेम सेल थेरपी ः एक प्रभावी उपाय

0
161
  • डॉ. प्रदीप महाजन
    (मेडिसीन रिसर्चर)

२०२०मध्ये जगभरात ‘प्रोजेरिया सिंड्रोम’ असणारी १७९ प्रकरणं समोर आली आहेत. अशा मुलांमध्ये सध्या ‘स्टेम सेल थेरपी’ हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. या उपचारपद्धतीमुळे मुलांचा मृत्यू काही वर्ष लांबवू शकतो जेणेकरून या आजाराने पीडित मुलं सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील.

कुठलाही आजार म्हटल्यावर प्रत्येकजण घाबरून जातो, यात वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यातच जगभरात दोन लाखांहून अधिक लोक दुर्मीळ आजारांनी त्रस्त आहेत. बर्‍याचदा हे आजार आनुवंशिक असतात. यातील काही आजारांवर प्रभावी असे उपाय नाहीत. परंतु, स्टेम सेल थेरपी यांसारख्या दुर्मीळ आजारांसाठी वरदान ठरू लागले आहे.

उदाहरणार्थ – ‘प्रोजेरिया सिंड्रोम’ हा अतिशय दुर्धर आजार आहे. या आजारात लहान मुलांमध्ये अकाली वृद्धत्व येतं. हा आनुवंशिक आजार आहे. २०२०मध्ये जगभरात ‘प्रोजेरिया सिंड्रोम’ असणारी १७९ प्रकरणं समोर आली आहेत. अशा मुलांमध्ये सध्या ‘स्टेम सेल थेरपी’ हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. या उपचारपद्धतीमुळे मुलांचा मृत्यू काही वर्ष लांबवू शकतो जेणेकरून या आजाराने पीडित मुलं सर्वसामान्य आयुष्य जगू शकतील.

‘जॉबर्ट सिंड्रोम (जेएस)’ हा मेंदूशी संबंधित विकार आहे. या विकारात शारीरिक हालचाल मंदावणे आणि स्नायू दुखीची समस्या जाणवते. याशिवाय अन्य काही समस्याही उद्भवतात. परंतु या आजाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. लहान वयातच हा आजार होतो. वाढत्या वयानुसार स्नायू कमकुवत होणं, शारीरिक हालचाली मंदावणं, स्नायू कमकुवत होणं अशी लक्षणं दिसून येतात. बर्‍याचदा लहान मुलांना दृष्टीदोष किंवा अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो. वयानुसार संबंधित व्यक्तीमध्ये यकृत, मूत्रपिंड आणि हार्मोनल समस्याही उद्भवू शकतात. या आजारावर स्टेम सेल थेरपीद्वारेही उपचार करता येणे शक्य आहे. या थेरपीमुळे मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यास अतिशय मदत मिळते.

‘व्हॅम्पायरीझम (पोर्फिरिया)’ हा अतिशय दुर्मीळ आजार आहे. याशिवाय पाण्यातील ऍलर्जीमुळे त्वचेचे विकार होऊ शकतात. या ऍलर्जीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु, काही संशोधकांनी असा दावा केला आहे की, पाण्यातील काही विरघळलेले पदार्थ रोगप्रतिकारशक्तीला चालना देतात. पोर्फिरिया या आजारात रूग्णाच्या त्वचेला फोड येणं, खाज सुटणं अशी लक्षणं दिसून येतात.

दुर्मीळ आजारांची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत. यात वेळीच निदान व उपचार झाल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. याशिवाय असे आजार असणार्‍या रूग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतेही प्रोटोकॉल नाहीत.

अचानक फिट येऊ लागल्याने एका मुलाला त्याचे आईवडील उपचारासाठी घेऊन आले होते. मेंदूशी संबंधित वैद्यकीय चाचण्या केल्या असता या मुलाला मेंदूसंबंधित विकार असल्याचे निदान झाले. तातडीने या मुलावर औषधोपचार सुरू करण्यात आले. परंतु, हळुहळु त्रास वाढू लागल्याने त्याला चालणंही अशक्य होऊ लागले. हा आजार मुख्यतः अनुवंशिक कारणांमुळे होतो. या आजारांवर स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार करणे शक्य आहे. या उपचारपद्धतीमुळे खराब झालेल्या पेशी आणि ऊतींचे पुनर्निर्माण करण्यास मदत होते. लक्षणांवर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येते. या मुलावर स्टेम सेल थेरपीद्वारे उपचार करण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत हळुहळु सुधारणा झाली आहे.

आपल्या शरीरातील पेशी आणि वाढीचे घटक मूलभूतपणे कोणत्याही बिघडलेल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी तयार केले गेले आहेत. यामुळे कुठल्याही गंभीर आजारावर त्या व्यक्तीच्या शरीरातील निरोगी पेशींचा वापर करून उपचार केले जातात. याशिवाय आजाराची लक्षणं आणि योग्य वेळी निदान होणं गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक दुर्मीळ आजार समजून घेणे आणि योग्य उपचारासाठी प्रोटोकॉल बनविणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला खात्री आहे की, भविष्यात आपण कुठल्याही दुर्मीळ आजारांवर सहज मात करु शकतो.