सॉफ्टवेअर तंत्रज्ञान विकासावर भर देण्याचा सरकारचा विचार

0
184

नवीन आयटी धोरण
नव्या आयटी धोरणात सरकारने सॉफ्टवेअर विकासावर अधिक भर देण्याचे ठरविले असून, लवकरच नवीन आयटी धोरण तयार होईल, त्यादृष्टीकोनातून प्रक्रिया सुरू झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून पावले उचलल्याने त्याच धर्तीवर गोव्याचेही नवे आयटी धोरण असेल, असे सांगण्यात येते. इलेक्ट्रॉनिक पध्दत डिझाईन आणि उत्पादनावर भर देण्याचे सरकारने ठरविले आहे. या धोरणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होईल. विधानसभा अधिवेशनातही सरकारने या क्षेत्रावर भर देण्याचे ठरविले आहे, अशी माहिती दिली होती. या क्षेत्रात गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांना काय पाहिजे हे समजून घेण्याचे सरकारने ठरविले आहे. या क्षेत्रातील युवकांना गोव्याबाहेर नोकरीसाठी जावे लागते.