सेवन टाळलेलेच बरे

0
264
  • डॉ. स्वाती हे. अणवेकर
    (म्हापसा)

शरीरावर होणारे दुष्परिणाम पाहिले असता, असे म्हणणे निश्‍चितच चुकीचे ठरणार नाही की… शीतपेयांचा आपल्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक सोसावे लागते. त्यामुळे यांचे सेवन टाळलेलेच बरे.

शीतपेयांना रंग आणणारे घटक –
१. रंग हे शीतपेयांना आकर्षक बनवतात.
२. त्याचप्रमाणे ते बनत असताना किंवा साठवून ठेवताना जर रंगात काही फेरफार झाल्यास तो सुधारतात. हे रंग तीन प्रकारचे असतात.
१. नैसर्गिक रंग –
हे वनस्पती, फळे व भाज्यांपासून बनतात. उदा. पिवळा- केशरी हा क्युटिलॉइड असून वनस्पती वाळवून काढतात. भटक लाल- जांभळा हा ऍँथोसायानिम असून हा फळे व भाज्यांपासून काढतात.
२. कृत्रिम रंग –
३. कॅरामेल्स –
चव आणणारे घटक हे रंगाच्या मानाने कमी प्रमाणात वापरले जातात. हेदेखील नॅचरल, नॅचरल आयडेन्टीकल आणि अँटीफिशियल प्रकारचे असतात.
प्रिझव्हेटिव्ज् –
केमिकल प्रि. हे शीतपेयांची मायक्रोबायॉलॉजिकल स्टॅबिलिटी वाढवायला वापरले जातात. हे प्रि. वापरताना त्या प्रिझव्हेटिव्हजची व शीतपेयांची केमिकल व फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या जातात. तसेच त्यांचा पीएच, त्यात असणारी जीवनसत्वे. त्याचे पॅकिंग आणि ते कोणत्या प्रकारे साठा करून ठेवले जातील … या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.
सॉर्बेट्‌स, बेन्झोएट्‌स, डायमिथील-डाय-कार्बोनेट हे प्रिझर्व्हेटिव्ह्‌ज ‘रेडी-टू-सर्व्ह’ शीतपेयांमध्ये वापरतात.
६) अन्य घटक ः-
वेगवेगळे हायड्रोकोलाइड्‌स जसे गौर व लोकस्ट, गम, पेक्टीन, झँथस इत्यादी. स्टॅबिलायझर्स व थिकनर्स म्हणून फळांच्या रसामध्ये वापरतात. तसेच त्यात फोमिंग एजन्ट्‌सदेखील मिसळतात.
त्यात ऍस्कॉर्बिक ऍसिडसारखे अँटीऑक्सीडन्ट्‌स घातले जातात, जे त्याची चव कायम राखतात व रंग खराब होऊ देत नाहीत.
काही फन्क्शनल पेयांमध्ये वनस्पतीचे स्टिरॉल्स व ओमेगा-३ फॅटी ऍसिड्‌स, पेयाचे आरोग्य चांगले राखायला त्यात मिसळतात.
७. स्पोर्टस् ड्रिन्क्स –
हे कुमार व युवा वयोगटात खूप प्रचलीत आहेत. यात पाणी, कर्बोदके जसे ग्लुकोज, माल्टोडिट्रीन व फ्रुक्टोज असतात. तसेच यात सोडियम, पोटॅशियम व क्लोराइड् हे इलेक्ट्रोलाइट्‌स असतात. हे इलेक्ट्रोलाइटस् त्यांची व्यवहार्यता वाढवण्यासाठी व शरीरातील द्रव व इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करतात. ते शरीराचा डिहायड्रेशनपासून बचाव करतात.
आधी खेळादरम्यान व खेळ पूर्ण झाल्यावर तसेच क्षमता वाढवणे व सुधारण्यासाठी साहाय्यक व्हायचा. खेळादरम्यान घामावाटे शरीरातून बाहेर फेकले जाणारे द्रव, इलेक्ट्रोलाइट व क्षार पुन्हा भरून काढायला ते मदत करतात. आणि शरीरास भरपूर कर्बोदके पुरवतात.
८. एनर्जी ड्रिन्क्स –
याचा बेस घटक ग्लुकोज असतो आणि यात असणार्‍या कॅफीन, ग्वारीना, टॉरीन व जिनसिंगमार्फत ते शरीरास ऊर्जा प्रदान करतात. हे मानसिक व शारीरिक क्षमता वाढवतात. त्याचप्रमाणे दक्षता, ध्यान, ताकद व मूड चांगले राखतात.
यात असणारे कॅफिनचे प्रमाण व तीव्रता ही प्रत्येक कंपनीनुसार बदलते.
शीतपेये आणि त्यातील घटकांचा आरोग्यावर होणारा परिणाम….

  • यात असणारी साखर ही मुलांचे दात कीडण्यासारख्या समस्यांचे मूळ आहे.
    हे तेव्हा होते जेव्हा तोंडातील लाळेचा पीएच हा त्याखाली जातो व दातांचे इनॅमेल नष्ट होते. शीतपेयांचा पीएच हा २.५ ते ३.५ असतो. कार्बोनेटेड पेय व फळांचे रस यांचा पीएच ३.४४ एवढा असतो. त्यात असणारे अम्ल किंवा ऍसिड हेदेखील दात किडण्याचे मुख्य कारण आहे.
    तसेच साखरेमुळे स्थौल्य, टाईप-२ मधुमेह, हृदयविकार व अकाली मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. अधिक प्रमाणात कार्बोनेटेड शीतपेये प्यायल्याने हाडांची घनता कमी होऊ लागते व हाडे ठिसूळ होतात.
    २. एनर्जी ड्रिन्क्स – यामध्ये असणारे कॅफिन हे अल्प प्रमाणात शरीर तोलू शकते. पण जर हे प्रमाण दिवसागणिक ४०० मिलिग्रॅ. दिवसाला इतके झाले तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. जसे थकवा, उतावीळपणा, हटवादीपणा, डोकेदुखी, उदासीनता इ. आणि याचे अतिसेवन अर्थात ५०० ते ६०० मिलिग्रॅ. दिवसाला एवढे केल्यास जीर्ण विषबाधा, नैराश्य, मळमळ, उलट्या होणे, आकडी येणे, हृदयविकार.
    ३. कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ किंवा घटक – हे त्या शीतपेयांमध्ये मिसळले जाते त्यामुळे त्याचा शरीरावर स्थूलता, लिम्फोमा, ल्युकेमिया, मूत्राशय कर्करोग, मेंदू कर्करोग, थकवा, पार्किन्सन, अल्झायमर्स, मल्टिपल स्न्लेरोसिस व्याधी निर्माण होतात.
    ४. यात मिसळले जाणारे अन्य पदार्थ – जसे लज्जत वाढवणारे घटक, रंग, स्टॅबिलायझर्स मुळे बराच काळ हे पेय वारंवार शरीरात गेल्यानंतर शरीरावर आपले दुष्परिणाम दाखवू लागतात जसे डोकेदुखी, शरीराची ऊर्जा कमी होणे, एकाग्रता साधता न येणे… हे लगेच दिसणारे परिणाम आहेत.
    तर दीर्घकाळपर्यंत याचे सेवन झाल्यास कर्करोग, रक्तवाहिन्यांची झीज होऊन होणारे आजार इत्यादी. सिन्थेटिक प्रिझर्व्हेटिव्ज्‌मुळे श्‍वसनाच्या संस्थेचे आजार बळावतात.
    तर कृत्रिम रंगामुळे एडीडी व एडीएचडी (अतिचंचलता) हे आजार बळावतात.
    शरीरावर होणारे वरील दुष्परिणाम पाहिले असता, असे म्हणणे निश्‍चितच चुकीचे ठरणार नाही की… शीतपेयांचा आपल्याला फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक सोसावे लागते. त्यामुळे यांचे सेवन टाळलेलेच बरे. आणि स्पोर्टस् ड्रिन्क्स आणि एनर्जी ड्रिन्क्स हे आवश्यक तेव्हाच घेतलेले बरे. त्यामुळे त्याचे निदान दुष्परिणाम शरीरावर होणार नाहीत.