सेझ जमिनींच्या लिलावासाठी सल्लागार नेमणार ः मुख्यमंत्री

0
263

सेझ जमिनींच्या लिलावासंबंधी सल्ला घेण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गोवा औद्योगिक विकास मंडळाच्या बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
आयडीसीने ताब्यात घेतलेल्या सेझ जमिनीच्या लिलावाबाबत सल्ला घेण्यासाठी सल्लागाराची निवड करण्यासाठी निविदा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. आयडीसीने सेझ कंपन्यांकडून ३८ लाख चौरस मीटर जागा ताब्यात घेतली आहे. सेझ कंपन्यांना जमिनीचे पैसे देण्यासाठी आयडीसीने कर्ज घेतले आहे. त्यामुळे ताब्यात घेतलेली जमिनीचा लिलाव करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे.

केंद्र सरकारने गोवा सरकारला मंजूर केलेल्या कोळसा खाणीच्या विकासासाठी खाण विकास ऑपरेटरची निवड करण्यासाठी निविदा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

या बैठकीत कोळसा खाणीवरही विचारविनिमय करण्यात आला आहे. केंद्राने मंजुर केलेली कोळसा खाण विकसित करण्याचा निर्णय कित्येक महिने प्रलंबित आहे. मंडळाच्या बैठकीत कोळसा खाणीसाठी सल्लागार, खाण विकास ऑपरेटरच्या नियुक्तीवर चर्चा करण्यात आली असून खाण विकास ऑपरेटरसाठी निविदा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.