सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी टीव्ही वाहिन्यांकडून नियमोल्लंघन

0
95

>> मुंबई उच्च न्यायालयाचा निवाडा

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्युप्रकरणातील दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्यांतील वार्तांकनात केबल टीव्ही नियमन कायद्याखालील नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने काढला आहे. एका जनहित याचिकेवरील निवाड्यात मुंबई उच्च न्यायालयाने काल सुशांतसिंह मृत्युप्रकरणातील ‘मीडिया ट्रायल’ वर कोरडे ओढले. दोन आघाडीच्या वृत्तवाहिन्यांचाही निवाड्यात उल्लेख करम्यात आला असून त्या वाहिन्यांचे वार्तांकन हे अवमानकारक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. मृत्यू आणि आत्महत्यांच्या बाबतीत प्रसारमाध्यमांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही न्यायालयाने जारी केली.