सुशांतसिंह मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीची चौकशी

0
126

>> शोविक चक्रवर्तीला पोलीस कोठडी

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी एनसीबीने सुशांतची प्रेमिका आणि अभिनेत्री रिय चक्रवर्ती हिला समन्स बजावले असून काल रविवारी सकाळी रिया चौकशीसाठी अमली पदार्थविरोधी पथकासमोर (एनसीबी) हजर राहिली. आता सुशांतच्या मृत्यूशी अमली पदार्थांचा संबंध तपासण्यासाठी एनसीबी शोविक, रिया, सुशांतचा नोकर दीपेश सावंत आणि अन्य दोन आरोपींची समोरासमोर चौकशी करणार आहे. तसेच दीपेश सावंत याने दिलेल्या जबानीवरून रिया चक्रवर्ती हिला अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, न्यायालयाने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक व सॅम्युअल मिरांडा यांना ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर याप्रकरणी एनसीबीने सुशांतच्या घरात काम करणार्‍या दीपेश सावंत याला अटक केली. दीपेश सावंत याच्या चौकशीत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दीपेश सावंत याची एनसीबीच्या पथकाने काल केलेल्या चौकशीत रियाच्या सांगण्यावरूनच घरात अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची माहिती दीपेश याने दिली. त्यामुळे रियाच्या अटकेची शक्यता वाढली असून सध्या एनसीबीच्या पथकाकडून रियाची चौकशी सुरू आहे.

दीपेश सावंतला कोठडी
दरम्यान अभिनेता सुशांतसिंहचा नोकर दीपेश सावंत याला ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एनसीबीने शनिवारी दीपेशला अटक केली होती. ईडीला मिळालेल्या मोबाइल चॅटनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि अन्य आरोपींसोबत दीपेशही अमली पदार्थांच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत चर्चा करत होता. रियाचा भाऊ शोविकच्या सांगण्यावरून दीपेशने अमली पदार्थ विकत घेतल्याची माहिती एनसीबीला मिळाली. शोविक याने स्वत:हून काही व्यक्तींची नावे उघड केली आहेत.