सुशांतसिंहप्रकरणी गोव्यातील व्यावसायिकाची चौकशी

0
136

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात गोव्यातील एका व्यावसायिकाची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. सदर व्यावसायिक हा सुशांतला त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्यामार्फत अमली पदार्थ पुरवायचा असा दावा केला जात आहे. याच प्रकरणी ईडी सदर व्यावसायिकाची चौकशी करणार आहे.

दरम्यान, रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकची सलग चौथ्या दिवशी सीबीआय चौकशी करत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये सीबीआयने रिया हिला या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले आहेत. रियाचीईडीने २६ तासांहून अधिक काळ चौकशी केली.