महिलांनाही करणार तैनात
पंजाबमधील सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) अंमली पदार्थ, दारूगोळा तस्करी आणि घुसखोरी रोखण्यासाठी दक्षता वाढवारआहे. पठाणकोट परिसरातून दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या अंदाजानंतर आता बीएसएफ संवेदनशील भागात आपल्या सैनिकांची संख्या वाढण्याच्या तयारी आहे. तसेच सीमेवर माऊंटेड सैनिकही तैनात करण्याचा विचार सुरू आहे.
राजस्थान-पाकिस्तान सीमेवर ज्याप्रमाणे सैनिक उंटावर गस्त घालतात, त्याचप्रमाणे पंजाब सीमेवर घोड्यावर स्वार झालेले सैनिक तयार केले जात आहेत. यासाठी महिला सैनिकांच्या तुकडीला विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. पठाणकोटमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर घुसखोरी रोखण्यासाठी गुरदासपूर सेक्टरमध्ये अधिक सैन्य तैनात करण्यात आले आहे. राजस्थानच्या वालुकामय भागात बीएसएफचे जवान उंटांवर गस्त घालत आहेत.
पंजाबमध्ये बीएसएफची 500 किलोमीटरहून अधिक लांबीची सीमा आहे. सध्या पंजाबमध्ये बीएसएफच्या सुमारे 20 बटालियन कार्यरत आहेत. यापैकी 18 सीमेवर तैनात आहेत, तर उर्वरित 2 आवश्यकतेनुसार तैनात करण्यात येणार आहेत.