सीमावादप्रकरणी न्यायालयात जाणार

0
82

>> आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट

आसाम-मिझोरम यांच्यातील सीमावादप्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी सांगितले. वादग्रस्त भाग हा वनक्षेत्रात येतो. परंतु तिथे अतिक्रमण झालेले आहे. सॅटेलाईट इमेजच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता. त्यामुळे आसाम सरकारने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री सर्मा म्हणाले.

आसामच्या बराक खोर्‍यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या ऐझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्यांना लागून १६४ किलोमीटरची सीमा आहे. त्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे. दोन्ही राज्यातील वादग्रस्त सीमा ओलांडून आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील एका पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर तेथे हिंसाचार सुरू झाला. यावेळी झालेल्या गोळीबारात आसामचे ५ पोलीस शहीद झाले.

सीमेवर गोळीबार सुरू असताना मी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना ६ वेळा फोन केला होता. तसेच, आमच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. पोलीस आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी तैनात आहेत, असा खुलासा मुख्यमंत्री सर्मा यांनी केला.

या बाबत बोलताना मुख्यमंत्री सर्मा यांनी, गोळीबार सुरू असताना मी ६ वेळा मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सॉरी म्हणून मला चर्चेसाठी निमंत्रण दिल्याचे सांगितले. मात्र आमच्या जमिनीचा एक इंचही तुकडा देऊ शकत नसल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.