सीझेडएमपीबाबतची फेरविचार याचिका लवादाने फेटाळली

0
40

गोव्याच्या किनारपट्टी विभाग व्यवस्थापन नकाशाचा अंतिम मसुदा येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास काल राष्ट्रीय हरित लवादाने नकार दिला. गोवा फाऊंडेशनची त्यासाठीची फेरविचार याचिका काल लवादाने फेटाळून लावली.

गोवा फाऊंडेशनने लवादाकडे ३१ ऑगस्टची मुदत काढून टाकण्याची मागणी केली होती. तसेच सदर जनसुनावणी घेतल्यानंतर किमान सहा महिन्यांची मुदत दिली जावी, अशी मागणीही संघटनेने केली होती. लोकांकडून येणार्‍या सूचना व शिफारशींची दखल घेऊन त्यांचा आराखड्यात समावेश करणे आवश्यक असल्याचे फाऊंडेशनने लवादाच्या नजरेत आणून दिले होते. मात्र, सदर अवधी वाढवण्यासही लवादाने नकार दिला.