सीएए समर्थनार्थ विधानसभेत ठराव

0
134

>> ठराव मांडणारे गोवा पहिले राज्य, ढवळीकरांव्यतिरिक्त विरोधकांचा सभात्याग

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल सीएए समर्थनार्थ ठराव मांडण्यात आला. हा ठराव मांडणारे देशातील गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे हा ठराव पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मांडला. बाबूश हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत. त्यांनी हा ठराव मांडला ही वैशिष्ट्यपूर्ण घटना मानली जाते.
गोवा विधानसभेत नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन ठराव काल संमत करण्यात आला. या ठरावावरील चर्चेच्या वेळी मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर वगळता विरोधी कॉँग्रेस, गोवा ङ्गॉरवर्ड, चर्चील आलेमाव, रोहन खंवटे यांनी सभात्याग केला.

सीएए दुरूस्ती कायद्यामुळे कुणाचेही नागरिकत्व रद्द केले जाणार नाही. सीएएमध्ये पोर्तुगीज नागरिकत्वाचा कोणताही विषय नाही. विरोधकांकडून चुकीची माहिती देऊन सीएएवरून नागरिकांना भडकविण्याचे काम केले जात आहे. विरोधकांच्या अङ्गवा, अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन ठरावावर बोलताना केले.

सीएए दुरूस्तीवरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सीएए दुरूस्तीला विरोध करणार्‍या लोकांनी दुरूस्त कायद्याचे योग्य प्रकारे वाचन केलेले नाही. असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. विरोधकांकडून सीएएच्या प्रश्‍नावर घोळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. एनपीआरच्या अर्जात एकच बदल केला आहे. केवळ पालकांच्या जन्मस्थळाची माहितीची नोंद करण्यासाठी एक कॉलम असून तोही ऐच्छिक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अल्पसंख्यांक आमदारांकडून ठराव
हा अभिनंदनाचा ठराव पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मांडला. सभागृहात या अभिनंदन ठरावावर सुमारे दोन अडीच तास चर्चा झाली. विरोधी कॉँग्रेस, गोवा ङ्गॉरवर्ड, अपक्ष आमदारांनी सभागृहात सीएए कायद्यावर अडीच तास चर्चेची मागणी केली. त्यामुळे अभिनंदन ठरावाच्या चर्चेच्या सुरूवातीला विरोधकांनी सभापतीच्या आसनासमोर येऊन सीएएवर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली. तथापि, सभापतींनी त्यावर नंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.
या अभिनंदन ठरावावर उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर, गोविंद गावडे, नीलेश काब्राल, मिलिंद नाईक, दीपक पाऊसकर, मावीन गुदिन्हो, उपसभापती इजिदोर ङ्गर्नांडीस, नीळकंठ हर्ळणकर, जोशुओ डिसोझा, सुभाष शिरोडकर, प्रवीण झांट्ये, ङ्ग्रान्सिस सिल्वेरा यांनी विचार मांडले.