नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मांडून तो संमत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव काल बाबुश मोन्सेरात यांनी विधानसभेत मांडला. त्यावेली विरोधकांनी त्याला जोरदार विरोध करत सभागृहात गोंधळ घातला. सभापती राजेश पाटणेकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन ‘शेम, शेम’ अशा घोषणाही दिल्या.
गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी या ठरावाला आक्षेप घेतला. सीएएवर चर्चा व्हावी, अशी मागणी आम्ही केलेली असून त्यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे त्याच प्रश्नावर मोदी व शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव तुम्ही कसा काय मांडता, असा प्रश्न केला त्यामुळे यावरून शाब्दीक चकमक झाली.