‘सीएए’ लागू करणारच : शहा

0
21

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरातील धर्मतला येथे एका जाहीर सभेत भाषण केले. या सभेत अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच आम्ही देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए लागू करणारच, असा ठाम निर्धार व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असून, या घुसखोरीमुळे राज्याचा कधीच विकास होणार नाही, असेही शहा म्हणाले.