सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

0
53

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाचे येत्या ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, प्रत्येक कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असणे गरजेचे नसल्याचे राणे यांनी सांगत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीची शक्यता फेटाळून लावली आहे. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ११.३० वाजता उद्घाटन करतील. यावेळी आपण स्वतः व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असतील असे राणे यांनी सांगितले. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दि. ७ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राणेंनी ही घोषणा केली आहे.