साहित्यिक गजानन जोग यांचे निधन

0
10

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ कोकणी साहित्यिक गजानन जोग यांचे काल अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सांतईनेज-पणजी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गजानन जोग हे मूळचे साकोर्डा येथील रहिवासी होते. त्यानंतर ते ताळगाव येथे स्थायिक झाले. जोग यांच्या ‘खांद आनी हेर कथा’ या पुस्तकाला 2017 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला होता. जोग यांना साहित्यासाठी अनेक पुरस्कार लाभलेले असून, पास्त, ओह! माय गोंय, शाप की वरदान ही कोकणी, तर मराठीत चौकटीच्या बाहेर अशी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी सुनेत्रा, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.