सावईवेरेत माडावर अडकलेल्या बिबट्याने स्वत:च केली सुटका

0
7

कुळणवाडा-सावईवेरे येथील भरवस्तीतील एका उंच माडावर चढल्यानंतर त्या माडावर अडकून पडलेल्या बिबट्याने सुमारे 20 तासानंतर कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली व मध्यरात्री 2.30 च्या दरम्यान त्याने या लोकवस्तीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगराळ भागात धूम ठोकली. त्यामुळे गेले सुमारे 20 तास तणाव व चिंतेत असलेल्या कुळणवाडा येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
काल रविवारी सकाळीच कुळणवाडा येथील लोकांना बिबटा माडावर असल्याचे कळल्यानंतर त्यांनी त्याबाबत वन खात्याला कळवले होते. वनखात्याचे कर्मचारी सकाळी 8 ते रात्री 2.30 वाजेपर्यंत पहारा ठेवून होते. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री माडावर काठ्या मारल्या असता बिबटा घाबरून कसाबसा माडावरून खाली उतरला. यावेळी त्याने पत्र्याच्या शेडवर उडीही घेतली. त्यानंतर तेथून त्याने डोंगराळ भागात धूम ठोकली.