सारझोरा येथील अपघातात दुचाकीस्वार ठार

0
5

सारझोरा येथे काल सकाळी कार व दुचाकी यांच्यातील भीषण अपघातात दुचाकीस्वार आग्नेलो रिबेलो (19, रा. कुडतरी) हा ठार झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली आहे.

काल सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गुडीच्या बाजूने येणाऱ्या कारचालक शेल्टन फुर्तादो (32, रा. ओडली) याने भरवेगाने कार चालवित रस्त्यावर बसून रवंथ करणाऱ्या एका गाईला धडक दिली. त्यानंतर तीन दुचाकींना देखील कारने धडक दिली. त्यात आग्नेल रिबेलो हा गंभीर जखमी झाला. तसेच अन्य दोघे दुचकी चालक मेकलॉईड रिबेलो (17) आणि आबनेर परेरा गंभीर जखमी झाले. त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले आहे.

अपघातानंतर आग्नेलो रिबेलो याला गोमेकॉत नेत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. तसेच कारने ज्या गाईला धडक दिली होती, तीही जागच्या जागी ठार झाली. भरवेगाने व निष्काळजीपणे शेल्टन फुर्तादो कार चालवित होता. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी शेल्टन फुर्तादो याला अटक केली आहे.