सांगे येथे सुमारे 1 कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज यांचा 30 फूट उंचीचा कांस्यधातूचा पुतळा बसविण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री तथा सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांनी काल एका पत्रकार परिषदेत बोलताना येथे दिली. सांगे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याच्या ठिकाणी नवीन पुतळा बसविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारण्यासाठी निधी संकलनाचे काम सुरू करण्यात आले आहे. सर्व नागरिकांच्या सहकार्यातून हा पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.