सहा महिन्यांनंतर कोरोना लशींच्या किंमतीत वाढ

0
39

सध्या नागरिकांना कोरोनाप्रतिबंधक सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाची स्पुतनिक व्ही या तीन लशी दिल्या जात आहेत. आता या लशींच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. याआधी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या एका डोससाठी अनुक्रमे २०० आणि २०६ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. मात्र सरकारसाठी असलेल्या या दरात आता वाढ केली आहे. यापुढे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनसाठी आता अनुक्रमे २०५ आणि २१५ रुपये सरकारला मोजावे लागणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली असून नव्या किंमतीनुसारच सरकारला ऑर्डर द्यावी लागणार असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. १६ जुलै २०२१ ला सीरम इन्स्टिट्यूटकडे कोव्हिशिल्ड लसीच्या ३७.५ कोटी डोसची तर भारत बायोटेककडे कोव्हॅक्सिनच्या २८.५ कोटी डोसची ऑर्डर केंद्र सरकारने दिली आहे.