सहकारी बँकांतील ठेवी आता ‘आरबीआय’च्या नियंत्रणाखाली

0
153

नागरी सहकारी बँका, शासकीय बँका तसेच मल्टी स्टेट को-ऑप बँकांना आरबीआयच्या नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.

जावडेकर यांनी सांगितले, शासकीय, नागरी सहकारी बँकांसह १४८४ बँका, ५८ मल्टी स्टेट को-ऑप बँका आता रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली येणार आहेत. शेड्यूल बँकांप्रमाणेच आरबीआय आपला अधिकार वापरेल.