सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे १७ बळी

0
91

>> राज्यात कोरोनाचे नवे ५७६ रुग्ण; ११६० कोरोनामुक्त

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले ५७६ नवे रुग्ण सापडले असून, १७ कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे सलग दुसर्‍या दिवशी १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात काल ११६० रुग्ण कोविडमुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे सक्रिय असलेल्या कोविड रुग्णांची संख्या ९०९९ एवढी झाली आहे. कोविडमुळे आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या २७२७ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५८ हजार ४२३ एवढी असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ५९७ एवढी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात सध्या सर्वाधिक रुग्ण हे मडगाव शहरात असून त्यांची संख्या ७३७ एवढी आहे. त्या पाठोपाठ फोंड्यात ७०६ रुग्ण असून, पणजीत ४६६ रुग्ण आहेत. पेडण्यात ४०८, कुडतरीत ४०५, पर्वरीत ४०३, चिंबलमध्ये ३८७, कांसावलीत ३४६, वाळपईत ३०३, कुडचडेत २८९, वास्कोत २८१, लोटलीत २२९, बाळ्ळीत २२८, काणकोणात १९१ रुग्ण आहेत.
काल नव्याने गृह विलगीकरणासाठी नोंदणी केलेल्यांची संख्या ५०३ एवढी आहे, तर ७३ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत इस्पितळात राहून उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या २६ हजार ९०० एवढी आहे, तर गृह विलगीकरणात राहून उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ०८ हजार ०५२ एवढी आहे.