सलग दुसर्‍या दिवशी पुन्हा एक कोरोना बळी

0
12

राज्यात चोवीस तासांत आणखीन एका कोरोना बळीची नोंद झाली असून, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५९ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ११०० जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यात नवीन १२७ कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी एका कोरोना रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ९८३ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ११.५४ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत आणखी १५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात नवीन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली, तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के एवढे आहे.

दरम्यान, आगामी गणेशोत्सवात कोरोना महामारी नियंत्रणात ठेवण्यासाठी नागरिकांनी कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संसर्ग रोखण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भाजपच्या मेडिकल विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी केले. गोवा गणेश चतुर्थीच्या काळात साथीचा फैलाव रोखण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असेही डॉ. साळकर यांनी म्हटले आहे.