सर्व पालिकांत आजपासून ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजना

0
96

गोवा सरकार ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना राज्यातील सर्व नगरपालिका तसेच पणजी महापालिकेत आजपासून सुरू करणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने पणजी महापालिकेसह सर्व ११ नगरपालिकांसाठी स्वयंपूर्ण मित्रांची नियुक्ती केली आहे.

सर्व नगरपालिका क्षेत्रात ‘स्वयंपूर्ण गोवा’ योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारने या स्वयंपूर्ण मित्रांवर सोपवली आहे. हे स्वयंपूर्ण मित्र दर शनिवारी नगरपालिका क्षेत्रांना भेट देऊन तेथे काही तास या योजनेसाठीचे काम करतील. राज्य व केंद्र सरकारच्या वरील योजनेची नगरपालिका क्षेत्रात व्यवस्थितपणे अंमतलबजावणी होते आहे की नाही हे पाहण्याबरोबरच नगरपालिका स्वयंपूर्ण कशा बनवाव्यात यासंबंधीही हे स्वयंपूर्ण मित्र पालिका क्षेत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
सध्या गोवाभरातील पंचायत क्षेत्रात १९१ स्वयंपूर्ण मित्र काम करीत आहेत.