‘सरकार तुमच्या दारी’ उद्यापासून ः मुख्यमंत्री

0
53

>> थिवी मतदारसंघातून शुभारंभ

प्रशासन लोकांच्या दारापर्यंत नेण्यासाठी गोवा सरकार उद्या रविवार दि. १९ सप्टेंबरपासून एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

‘सरकार तुमच्या दारी’ असे या कार्यक्रमाचे नाव असून थिवी मतदारसंघातून उद्या १९ रोजी या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. राज्य सरकारच्या सर्व संबंधित खात्यांचे प्रतिनिधी यावेळी हजर असतील. यावेळी लोकांनी मांडलेल्या विविध समस्या ते ऐकून घेतील. तसेच अडून पडलेल्या फाईली हातावेगळ्या करतील. या कार्यक्रमाला आपण स्वत: जातीने अर्धा दिवस हजर राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारचा संबंध येत असलेले सगळे प्रश्‍न त्याचबरोबर रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक कार्ड, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, किसान कार्ड, समाज कल्याण योजना आदीसंबंधीचे प्रश्‍न या कार्यक्रमात वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांसमोर मांडण्यात येतील.
हा कार्यक्रम कालांतराने राज्यभरातील सर्व मतदारसंघात मांडण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.