सरकारी पातळीवरील शिगमोत्सव 8 मार्चपासून

0
14

>> पर्यटनमंत्र्यांची माहिती; फोंड्यातून होणार प्रारंभ; 14 ठिकाणी आयोजन

यंदा सरकारी पातळीवरील शिगमोत्सव दि. 8 मार्चपासून सुरू होणार असून, एकूण 14 ठिकाणी या शिगमोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिगमोत्सवाची सुरुवात 8 मार्चला फोंडा शहरातून होणार असल्याचे रोहन खंवटे यांनी सांगितले. त्यानंतर दि. 9 रोजी कळंगुट, दि. 10 रोजी साखळी-डिचोली, दि. 11 रोजी पणजी, दि. 12 रोजी पर्वरी, दि. 13 रोजी म्हापसा आणि दि. 14 रोजी वाळपई व पेडणे येथे एकाच दिवशी शिगमोत्सव मिरवणूक होणार आहे.

दि. 15 रोजी सांगे, दि. 16 रोजी कुडचडे-केपे, दि. 17 रोजी वास्को, दि. 18 रोजी मडगाव, दि. 19 रोजी शिरोडा, दि. 20 रोजी कुंकळ्ळी आणि दि. 21 रोजी काणकोण येथे शिगमोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिगमोत्सवाच्या तयारीसाठी सोमवारी पर्यटन खाते आणि ठिकठिकाणच्या शिगमोत्सव आयोजन समित्यांची संयुक्त बैठक झाल्याचे रोहन खंवटे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला मंत्री सुभाष शिरोडकर, आमदार चंद्रकांत शेट्ये, जोशुआ डिसोझा, प्रवीण आर्लेकर व एल्टन डिकॉस्टा हे हजर होते.