सरकारी जमिनीत बेकायदा बांधकाम केल्यास आता खाते प्रमुख जबाबदार

0
207

सरकारी जमिनीमध्ये यापुढे बेकायदा बांधकामे बांधल्यास त्याला खाते प्रमुखाला जबाबदार धरले जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आमदार ग्लेन टिकलो यांच्या खासगी ठरावावर बोलताना काल दिला.

राज्यातील कोमुनिदाद जमिनीमध्ये अनेक बेकायदा घरे आहे. ही घरे कायदेशीर करण्यासाठी तरतूद करावी, असा खासगी ठराव टिकलो यांनी मांडला. या ठरावामुळे कोमुनिदादमधील बेकायदा बांधकामांवर जोरदार चर्चा करण्यात आली. ही घरे कायदेशीर केल्यास बेकायदा बांधकामांना प्रोत्साहन मिळेल असा दावा अनेक आमदारांनी केला. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री जेनिङ्गर मोन्सेरात यांच्या आश्‍वासनानंतर टिकलो यांनी ठराव मागे घेतला.