समुद्री लाटांपासून वीजनिर्मिती प्रकल्पावर सरकारचा विचार

0
182

सरकार समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करणार्‍या टायडल पॉवर वीज प्रकल्पावर विचार विनिमय करीत आहे. केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर टायडल पॉवर प्रकल्पाच्या अभ्यास करण्यासाठी एक शिष्टमंडळ इस्त्रायलला भेट देणार आहे, अशी माहिती वीज मंत्री निलेश काब्राल यांनी काल दिली.

गोवा राज्याला सध्या इतर राज्यांकडून वीज खरेदी करावी लागत आहे. गोव्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध पर्यायावर विचार केला जात आहे. राज्यात थर्मल वीज निर्मिती शक्य नाही. गोव्याला मोठा समुद्र मोठा किनारा लाभलेला आहे. त्यामुळे समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करणारा टायडल पॉवर वीज प्रकल्पावर विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.

इस्त्रायल देशामध्ये लाटांपासून विजेची निर्मितीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. या वीज निर्मिती प्रकलाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रायल येथे शिष्टमंडळ पाठविण्यास मान्यता देण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. राज्यात टायडल पॉवर निर्मितीसाठी इस्त्रायली तंत्रज्ञानाची मदत घेतली जाऊ शकते, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.