समुद्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

0
1

बेताळभाटी येथे समुद्रात पोहायला उतरलेल्या बंगळुरू येथील भारत एस. के. कृष्णा उदपा (37) याचा बुडून मृत्यू झाला. तो आपल्या कुटुंबीयांसमवेत बेताळभाटी येथील किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो समुद्राच्या पाण्यात पोहायला उतरला असता गटांगळ्या खाऊ लागला. त्याला जीवरक्षकांनी तात्काळ पाण्यातून बाहेर काढले व गंभीर अवस्थेत दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.