सभापतीपद नको, मुख्यमंत्री होण्याची इच्छा!

0
140

>> मायकल लोबो यांचे वक्तव्य

गोव्याचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण, भाजपने अजूनपर्यंत संधी दिलेली नाही. सभापती होण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट मत हंगामी सभापती मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केले.

भाजपने आपणाला सभापतीपदाची ऑफर दिली आहे. परंतु, आपणाला सभापतीपद नको आहे. आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. पण, भाजपने या इच्छेची पूर्तता केलेली नाही. भाजपकडून इच्छेची पूर्तता कधी केली जाते याच्या प्रतीक्षेत आहे. भाजपने मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची ऑफर दिल्यास निश्‍चित स्वीकारणार आहे. पण, सभापतीपद स्वीकारणार नाही, असे मत लोबो यांनी व्यक्त केले.

सभागृहातील ज्येष्ठ आणि तटस्थ व्यक्तीची सभापतीपदी निवड झाली पाहिजे. आपण उपसभापतीपदावर समाधानी आहे. हंगामी सभापती म्हणून कार्य करण्याची मिळालेली संधी पुरेशी आहे, असे मत लोबो यांनी व्यक्त केले. सभापतीपदी असलेल्या व्यक्तीला सभागृहात आणि बाहेर लोकांना भेडसावणारे प्रश्‍न मांडण्यावर बंधने येतात. आपणाला लोकांचे प्रश्‍न मांडायचे आहेत, लोबो म्हणाले.

मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्‍नच नाही : डॉ. सावंत
गोव्याचे मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. गोवा विधानसभेचे सभापतीपद रिक्त आहे. त्यावर विचार होऊ शकतो. राज्याचा मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.