सन २०२० सालातील वाचकप्रिय पुस्तके

0
436
  • कालिदास बा. मराठे

‘ललित’ मासिक गेली चौपन्न वर्षे दर वर्षाच्या एप्रिल महिन्यात ‘चोखंदळ वाचक निवड’ प्रसिद्ध करत असते. या उपक्रमांतर्गत त्या-त्या वर्षी प्रसिद्ध होणार्‍या उत्तम पुस्तकांचा शोध घेत असते. यासाठी मार्चमध्ये त्या-त्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध करते. अशा सुमारे ५०० लेखक-वाचकांना आवडलेली पुस्तके.

ग्रंथप्रेम असणार्‍या मराठी वाचकाला ‘ललित’ मासिकाविषयी सांगण्याची गरज नाही. सन १९६३ साली ‘ललित’ मासिक ग्रंथलेखन, ग्रंथप्रसार, ग्रंथसंग्रह या विषयांसाठी वाहून घेतलेले मासिक म्हणून सुरू करण्यात आले.

सन १९६५ पासून हे मासिक म्हणजेच गेली चौपन्न वर्षे दर वर्षाच्या एप्रिल महिन्यात ‘चोखंदळ वाचक निवड’ प्रसिद्ध करत असते. या उपक्रमांतर्गत त्या-त्या वर्षी प्रसिद्ध होणार्‍या उत्तम पुस्तकांचा शोध घेत असते. यासाठी मार्चमध्ये त्या-त्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी प्रसिद्ध करून सुमारे ५०० लेखक-वाचक यांना त्यांना आवडलेल्या तीन पुस्तकांची यादी देण्याचे आवाहन करीत असते.

सन २०२० मधील पुस्तकांची निवड करण्यासाठी मार्च २०२१ च्या अंकात अशी यादी प्रसिद्ध करून लेखक-वाचकांना आवाहन केले होते. त्याप्रमाणे एप्रिल २०२१ च्या अंकात ११० लेखक-वाचकांनी जी पसंती कळविली ती त्यांच्या नावासकट छापण्यात आली आहे.
‘ललित’ मासिकाचा नियमित वर्गणीदार या नात्याने मलाही गेली अनेक वर्षे या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते. या ‘ललित’ मासिकात जी नियमित सदरे प्रसिद्ध होतात, त्यांवरून पुस्तकांची चांगली ओळख होत असते. ग्रंथालयांतून आणून किंवा स्वतः विकत आणून अशी पुस्तके वाचून प्रत्यक्ष कोणते पुस्तक उत्तम हे ठरविता येते.

‘ललित’ मासिकात दर महिन्याला खालील सदरे प्रसिद्ध होतात.
१. ‘लक्षवेधी’ पुस्तके या सदरात ३-४ पुस्तकांचा परिचय असतो.
२. ‘दृष्टिक्षेप’ या सदरात पण ३-४ नवीन पुस्तकांचा परिचय असतो.
३. ‘मानाचे पान’ या सदरात एखाद्या महत्त्वाच्या पुस्तकाचा परिचय करून दिला जातो.
४. ‘इथे-तिथे’ सदरात पण लेखक व पुस्तके यांची दखल घेतली जाते.
५. ‘साभार पोच’ या सदराखाली ‘ललित’ मासिकाला निवडलेल्या पुस्तकांची दखल घेतली जाते.
६. त्या-त्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची यादी कादंबरी, कथासंग्रह, कविता, चरित्रे/आत्मचरित्रे, ललित लेखन, बालवाङ्‌मय आणि विविधा या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली जाते.
याशिवाय नामवंत प्रकाशकांच्या नव्या-जुन्या पुस्तकांच्या जाहिराती असतात.

आपल्यासारख्या वाचकांना त्यामुळे त्या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांची माहिती मिळते. कोणती पुस्तके वाचली पाहिजेत, विकत घेतली पाहिजेत ते कळते. यादृष्टीने सर्व ग्रंथालयांत, शाळा-महाविद्यालयांच्या ग्रंथालयांत ‘ललित’ मासिक असायला हवे. अर्थात आता नामवंत प्रकाशकही आपापल्या प्रकाशनाची माहिती देण्यासाठी वार्तापत्रे प्रकाशित करत असतात. मुख्य ग्रंथालयात ती ठेवायला हवीत.
आता आपण २०२० सालात जास्तीत जास्त लेखक-वाचकांनी निवडलेली पुस्तकांची यादी पाहू-
१. दाट काळा पाऊस – भारत सासणे
२. इन्शाअल्लाह – अभिराम भडकमकर
३. लढे आणि तिढे – चिकित्सक गप्पा… पुष्पाबाईशी, संपादन ः मेधा कुलकर्णी
४. तिसरा डुळा – किरण येले
५. भालचंद्र नेमाडे – व्यक्ती, विचार आणि साहित्य, संपादन ः विलास खोले
६. अनुनाद – अरुण खोपकर
७. इति-आदि – अरुण टिकेकर
८. ऋतु बरवा- विश्वास पसेकर
९. तसनस- आसाराम लोमटे
१०. पोर्टफोलिओ- भानू काळे
११. अस्तित्वाची शुभ्र शिडे- नागनाथ कोतापाल्ले
१२. उभ्या पिकातलं ढोर – अवधूत परळकर
१३. पाण्यारण्य – दिनकर मतकर
१४. पतंग- मिलिंद बोकील
१५. बिटवीन द लाईन्स – चंद्रमोहन कुलकर्णी
१६. कलाकृती आणि समीक्षा- गंगाधर पाटील
१७. टिपवणी- डॉ. सिसिलिया कार्र्‍हालो
१८. पंगतीतलं पान- अविनाश कोल्हे
१९. विजेने चोरलेले दिवस- संतोष जगताप
आता या यादीतील पुस्तके गावातील आपल्या ग्रंथालयात आहेत का याची चौकशी वाचकांनी करावी. जी पुस्तके नसतील ती आणण्याची विनंती ग्रंथालयाच्या व्यवस्थापन समितीला करावी. वाचक सल्लागार समिती पण अशी काही पुस्तके भेट म्हणून आपापल्या ग्रंथालयाला देऊ शकेल.

एकशे दहा जणांनी आपली पसंती कळवली. याची या एकोणीस पुस्तकातील किती पुस्तके जुळली त्याची वर्गवारी करण्याचा मी प्रयत्न केला.
१. या यादीतील एकही पुस्तक जुळले नाही – ८ वाचक
२. या यादीतील एक पुस्तक जुळलेले – ३१ वाचक
३. या यादीतील दोन पुस्तकं जुळलेले – ४२ वाचक
४. या यादीतील तीन पुस्तकं जुळलेले – २९ वाचक
ललित मासिकात वर्षभरात या यादीतील अनेक पुस्तकांचा परिचय वर उल्लेख केलेल्या सदरात आलेला आहे.
‘लक्षवेधी पुस्तके’ या सदरात फेब्रुवारी २०२१ मध्ये इन्शाअल्लाह, तिसरा डुळा मार्च २०२१ मध्ये, चिकित्सक गप्पा… पुष्पाबाईशी एप्रिल २०२१ मध्ये, कलाकृती आणि समीक्षा या पुस्तकांचा समावेश आहे. तर ‘दृष्टिक्षेप’ या सदरात ‘ऋतु बरवा’, ‘विजेने चोरलेले दिवस’ या पुस्तकांचा परिचय आहे. ‘मानाचे पान’ या सदरात ‘भालचंद्र नेमाडे ः व्यक्ती, विचार आणि साहित्य’ (एप्रिल २०२१) तर याच सदरात फेब्रुवारीच्या अंकात ‘दाट काळा पाऊस’ या पुस्तकांचा परिचय आहे.
११० वाचकांनी एकोणीस पुस्तकांविषयी जी पुस्तके सुचवली त्यांची यादी केली तर ७३ भरते. त्यांची यादी खालीलप्रमाणे-
१. चौकात उधळले मोती- अंबरीश मिश्र
२. ग्रेटाची हाक- अतुल देऊळगावकर
३. वाग्देवीचे वरदवंत (ज्ञानपीठ लेखक) – मंगला गोखले
४. मनातील माणसं – राजीव बर्वे
५. ९६ मेट्रोमॉल – प्रणव सरुदेव
६. चौथा स्तंभ- पंकज कुरुळकर
७. डिटेक्टीव्ह अगस्ती- श्रीकांत बोजेवार
८. संप्रति- नंदा खरे
९. शेलकी- गणेश मतकरी
१०. निर्वासीत- अनघा केसकर
११. सलणारा सलाम- अनुराधा नेरुरकर
१२. गांधी ः पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा- रावसाहेब कसबे
१३. जग थांबतं तेव्हा- गौरी कानेटकर
१४. कविता- संदर्भ आणि दृष्टिकोन- आशुतोष पाटील
१५. बोलिले जे- अतुल देऊळगावकर
१६. समग्र नामदेव ढसाळ- मल्लिका अमरशेख
१७. अरुण्यरुदन – भालचंद्र जोशी, अनु.- चंद्रकांत भोंजाळ
१८. हिंसेचा प्रतिरोध – गणेश देवी
१९. वाल्मिकी समाज- डॉ. प्रभाकर मांडे
२०. महाकवी दुःखाचा- मिर्झा गालिब, अनु.- नंदू मुलमुले
२१. आत्मनाद- श्रीकृष्ण बेडेकर
२२. फुल्लोर- डॉ. विजया वाड
२३. काळोखाच्या कविता – नामदेव कोळी
२४. बुडता आवरी मज- सुरेंद्र दरेकर
२५. गांधी- अंतिम पर्व- रत्नाकर मतकरी
२६. युगानुयुगे तूच – अजय कांडर
२७. नाटक ः एक मुक्तचिंतन – रवीन्द्र लाखे
२८. कलादर्पण – रमेशचंद्र पाटकर
२९. नो, नॉट, नेव्हर – बाबाराव मुसळे
३०. उघडा, दरवाजे उघडा – कृष्ण चंदर, अनु. – भारत सासणे
३१. मग एकच धडकी- त्र्यं. वि. सरदेशमुख
३२. जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन- प्रदीप इंदूलकर
३३. गर्भवान राजा – देवदत्त पटनायक, अनु. – संजय भा. जोशी
३४. लव्ह इन द टाईम ऑफ करोना- अनुजा जगताप
३५. संवाद – गणेश देवी, अनु.- किरण शाह
३६. युगानुयुगे तूच – अजय कांडर
३७. संहिता ः ललित आणि ललितेतर- सुधा जोशी
३८. दादोबा पांडुरंग तर्खडकर ः व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व- रजनीश जोशी
३९. करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस – डॉ. आनंद नाडकर्णी
४०. आंबेडकरांची जाती मिमांसा- उमेश बागडे
४१. सृजनगंध- डॉ. चंद्रकांत पोतदार
४२. काटेरी पायवाट- अनंता सुद
४३. रिंगण – माधुरी मरकडे
४४. आरभाट नोंदीचं प्रकरण – रवीन्द्र लाखे
४५. गाभुळलेल्या चंद्रवनात – विश्‍वास पाटील
४६. पधारो म्हारो देश- विष्णू पावले
४७. आगंतुकाची स्वगते- कैलास दौंड
४८. गावठी गिच्या- सचिन वसंत पाटील
४९. अडीच अक्षरांचा प्रवास- मनोज कुलकर्णी
५०. लेखकाचा मृत्यु आणि इतर गोष्टी- जयंत पवार
५१. हुसेनभाय और गणपतमाम व्हाया अमेरिका- वर्जेश सोळंकी
५२. ग्रेप्स ऑफ रॉय – जॉन स्टॉइनरेक, अनु. – मिलिंद चंपानेरकर
५३. सुसाट जॉर्ज – निळू दामले
५४. तिरपागड्या कथा – मुकुंद टांकसाळे
५५. बाकी संचित- परेश प्रभू
५६. फकिरीचे वैभव- विजय विल्हेकर
५७. दिवस बोलू देत नाहीत- गजानन फुसे
५८. कर्कवृत्त- वसंत आबाजी डहाके
५९. भवताल- रवीन्द्र शोभणे
६०. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर – संघर्ष आणि समन्वय- नामदेव कांबळे
६१. मंथन – जी. के. ऐनापुरे, अजीज
६२. चाफा लावीन तिथे लाल- वसंत दाहोकर
६३. प्रतिभावंताचे गाव- सुनीता राजे पवार
६४. वेदतांचे चेहरे – संभाजी मळशे
६५. नामुष्कीचे पिढीजात वर्तमान- विनायक पवार
६६. ढग- विश्राम गुप्ते
६७. करोनाष्टक – डॉ. बाळ फोंडके
६८. मायविये तहरीर – मंगेश ना. काळे
६९. ताडोबाचे पडघम आणि इतर भय – गिरीश देसाई
७०. लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी – जयंत पवार
७१. डॉ. गालिब – काळ, चरित्र आणि व्यक्तिमत्व – डॉ. अमरकुमार काळे
७२. अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी- डॉ. प्रमोद मुनवाटे
७३. वारंवार कुरुक्षेत्री येताती मनुष्ये- मकरंद साठे
वरील यादीवर दृष्टिक्षेप टाकल्यास खालील निरीक्षणे नोंदविता येतील-
१. श्री. गणेश देवी आणि श्री. अतुल देऊळगावकर यांची दोन पुस्तके आहेत.
२. महात्मा गांधीसंबंधी तीन पुस्तके आहेत. डॉ. आंबेडकरांसंबंधी दोन पुस्तके आहेत.
३. आपल्या गोव्यातील लेखकांची दोन पुस्तके आहेत. (विश्‍वास गुप्ते, परेश प्रभू)
४. यावर्षी साहित्य अकादमीने निवडलेले लेखक नंदा खरे (परंतु त्यांनी तो पुरस्कार घ्यायला नकार दिला.) यांचे पुस्तक ‘संप्राति’ या यादीत आहे.

पहिली एकोणीस पुस्तके आणि इतर त्र्याहत्तर पुस्तके बघितली तर त्यांमध्ये मुलांसाठी एकही पुस्तक दिसत नाही. खरे तर आजची मुले उद्याचे वाचक आहेत- लेखक आहेत. त्यामुळे ६ ते १८ वयोगटातील मुलांनी कोणीती पुस्तके वाचावीत याचा आढावा घेणारा उपक्रम एखाद्या नियतकालिकाने दरवर्षी करायला हवा असे यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.

ताजा कलम
हा लेख पूर्ण करत असतानाच ‘लोकसत्ता’ या दैनिकाने आपल्या १६ मेच्या रविवारच्या अंकात ‘लोकरंग’ पुरवणीत नामवंत अशा लेखक, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी, अभिनेते, तरुण तेजांकित व्यक्तींकडून- जे शंभर आहेत- ‘वाचू आनंदे, घडूया स्वानंदे’ अशी घोषणा देत सुचविलेल्या पुस्तकांची यादी छापली आहे.

या यादीचे विश्‍लेषण केल्यास जास्तीत जास्त लेखक-वाचकांनी सुचविलेली यादी पुढीलप्रमाणे आहे-
१. एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर
२. श्यामची आई – साने गुरुजी
३. फास्टर फेणे- भा. रा. भागवत
४. वाचू आनंदे- संपादन- माधुरी पुरंदरे, सहाय्य- नंदिता वागळे
५. अग्निपंख – डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनु. माधुरी शानभाग
६. राजा शिवछत्रपती – बाबासाहेब पुरंदरे
७. वनवास- प्रकाश ना. संत
८. श्रीपान योगी- रणजित देसाई
९. पंखा – प्रकाश ना. संत
१०. बोक्या सातबंडे – दिलीप प्रभावळकर
११. व्यक्ती आणि वल्ली- पु. ल. देशपांडे
१२. रारंग ढांग- प्रभाकर पेंढारकर
१३. मृत्युंजय- शिवाजी सावंत
१४. महाभारत
१५. प्लेइंग इट माय वे- सचिन तेंडुलकर
१६. पाऊस- माजौरी रेकिंग, अनु. राम पटवर्धन
१७. छावा- शिवाजी सावंत
१८. चौघीजणी- लुईस अलकॉट, अनु. शांता शेळके
१९. वामन परत न आला- जयंत नारळीकर
२०. पानिपत- विश्‍वास पाटील
२१. कोसला- भालचंद्र नेमाडे
२२. शाळा- मिलिंद बोकील
२३. गोट्या- ना. धों. ताम्हनकर
२४. आजीच्या पोतडीतील गोष्टी- सुधा मूर्ती, अनु. – लीना सोहनी
२५. तोत्तोचान- तेस्तुको कुरोयानागी, अनु. चेतना सरदेशमुख गोसावी
२६. सृष्टीत-गोष्टीत- डॉ. अनिल अवचट
२७. प्रकाशवाटा- डॉ. प्रकाश आमटे
२८. बलुतं- दया पवार
२९. विंदा करंदीकर यांच्या बालकविता
३०. मालगुडी डेज
३१. बोलगाणी- मंगेश पाडगावकर
३२. फेलुदा- सत्यजित राय, अनु. – अशोक जैन
३३. झाड लावणारा माणूस – जॉ जिओती, अनु.- माधुरी पुरंदरे
३४. सिंहासन- अरुण साधू
३५. बरवर बिम्मची- जी. ए. कुलकर्णी
आपल्या शाळेच्या गावातील ग्रंथालयात वरील यादीतील पुस्तके आणण्याचा प्रयत्न करुया.
वाचनासंबंधी, पुस्तकांसंबंधी जी पुस्तके या दोन वर्षांत आली त्यांची यादी-
१. वाचन- सुनीलकुमार लवटे
२. वाचनसमृद्धीचे संदर्भ- नीलिमा भावे
३. मुलांचे ग्रंथालय- मंजिरी निंबकर
४. वाचन महत्ता- श्रीकांत नाईक
५. वाचन करणारा समाज घडवू या- नरेंद्र लांजेकर
६. वाचनाविषयी सर्व काही- कालिदास बा. मराठे
७. पासोडी- नीतिन रिंढे
८. पुस्तकनाद- जयप्रकाश सावंत
९. द गुड बुक्स गाईड – एनबीटी
१०. प्लेजर ऑफ रिडिंग- एनबीटी