संमत झालेली तिन्ही कृषी विधेयके शेतकर्‍यांच्या हिताचीच : सावईकर

0
269

२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने देशातील शेतकर्‍यांच्या हितासाठी कित्येक योजना राबवल्या. हल्लीच संसदेत संमत करण्यात आलेली तिन्ही कृषी विधेयके ही शेतकर्‍यांच्या हिताचीच असून विरोधी पक्ष विनाकारण या प्रश्‍नावरून सरकारवर टीका करीत असल्याचा आरोप काल भाजपचे सरचिटणीस व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

नव्या विधेयकांमुळे शेतकर्‍यांची दलालांपासून सुटका होईल व त्यांना आपला शेती माल सर्वाधिक दर मिळेल अशा ठिकाणी नेऊन विकता येईल. त्याशिवाय पीक येण्यापूर्वीच त्यांचा शेती माल खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांबरोबर शेतकरी करार करू शकतील, असे सावईकर यांनी सांगितले. या व्यवस्थेत दलालांना स्थान नसेल असा दावा सावईकर यांनी केला.

भाजपच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष वासू मेंग गांवकर हे यावेळी बोलताना म्हणाले की, संसदेत संमत झालेली तिन्ही कृषी विधेयके ही शेतकर्‍यांच्या हिताची आहेत.