श्री श्री रवी शंकर यांना ‘इसिस’कडून धमकी पत्र

0
155

अध्यात्म नेते श्री श्री रवी शंकर यांच्या मलेशियातील शाखेला इसिस (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेने धमकी देणारे पत्र पाठविले असल्याची माहिती रवी शंकर यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी दिली आहे. रवी शंकर शुक्रवारी मलेशियात पोचले असून त्याआधी ते कंबोडियात होते. या पार्श्‍वभूमीवर इसिसकडून धमकीची दोन पत्रे मिळाल्याचे या सूत्रांनी सांगितले. त्यानंतर संस्थेतर्फे मलेशियातील भारतीय दुतावासाला या संदर्भात कळविण्यात आले आहे. संस्थेत काल योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व तेथे दहा हजार लोकांची उपस्थिती होती. पेनंग येथेही असाच भव्य उपस्थितीतील कार्यक्रम होणार आहे. अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी इसिसने दिल्ली आहे.