शिवसेना, शिंदे गटाच्या याचिकेवर १ रोजी सुनावणी

0
15

महाराष्ट्रात शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात एक ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर या याचिकांची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी काल बुधवारी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेच्या मागणीवर सुनावणीसाठी न्यायालय तयार झाले असून एक ऑगस्ट रोजी इतर याचिकांसोबत याही मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे.

शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहेत. त्याला शिंदे गटाने आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा याचिकांवर निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे शिवसेनेने म्हटले आहे.