शिवसेना पक्षचिन्हाचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे

0
12

>> आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्या याचिकेवरील काल झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला.

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्हावर कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोगाला घेता येणार आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. त्याला स्थगितीस न्यायालयाने काल नकार दिला.

घटनापीठाच्या
सुनावणीचे थेट प्रक्षेपण

कालपासून जनतेला सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठाच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण पाहता आले. त्याची सुरुवात ठाकरे विरुद्ध शिंदे खटल्याने झाली. देशवासीयांना या खटल्याचे यू-ट्यूबवरून थेट प्रक्षेपण पाहता आले. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी लवकरच सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी या न्यायालयाच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रक्षेपित केल्या जातील, अशी माहिती दिली.