>> आयोगाकडे तक्रार
दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या दिड महिन्यापासून सुरू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनाला तेथील आम आदमी पक्षाची फूस असल्याची तक्रार भाजपच्या एका शिष्टमंडळाने काल निवडणूक आयोगाकडे केली.
केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, मुख्तार अब्बास नकवी, भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव व अन्य ज्येष्ठ भाजप नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यादव यांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली की शाहीन बाग येथील सीएए विरोधी निदर्शकांचा सर्व खर्च तेथील आम आदमी पक्षाच्या उमेदवारांकडून केला जात आहे. या संदर्भात आयोगाला पुराव्यादाखल कागदपत्रेही देण्यात आल्याचे यादव यांनी सांगितले. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. या सर्व गोष्टींची आयोगाने दखल घ्यावी, असे आवाहन यादव यांनी केले. आयोगाने या प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.