शाश्‍वत शेतीसाठी वनीकरण

0
289
  • श्रीरंग जांभळे

वनशेती ही एक महत्त्वाची संकल्पना शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. वनशेती ही शेती उत्पादनातील सुधारित पद्धत आहे. याचा एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने जगभर गांभीर्याने विचार केला जात आहे. परंतु भारतातील काही भागांत व गोव्यातही ही पीक पद्धती परंपरागत पाहायला मिळते.

वनांचे महत्त्व आपण सारेजण ओळखतो. याविषयी खूप बोलले जाते, लिहिले जाते. मान्सुनच्या सुरुवातीला वृक्षारोपणाचे अनेक उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की त्यांची ओळख त्या देशांमध्ये असलेल्या समृद्ध वनांमुळे जगाला झाली आहे. जगभर हे स्थापित झाले आहे की, सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

जागतिक हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनाच विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. मोठमोठ्या जंगलांना लागलेल्या (की लावलेल्या?) आगींचे वृत्त ऐकून मन हेलावून जाते. या उसळलेल्या आगडोंबात किती मोठ्या संख्येने वनस्पती आणि प्राणी जळून खाक होतात याची कल्पनाच करवत नाही. जंगलतोड, जंगलांना लागलेल्या व लावलेल्या आगी, विविध कारणांमुळे पाण्याचे स्रोत नष्ट होणे यांमुळे बर्‍याच जीवांचा अधिवास नष्ट होतो. याचा सरळ-सरळ परिणाम शेतीवरही होतो. भारतातील वेदिक वाङ्‌मयात अरण्यक्षेत्र हे कृषिक्षेत्रापेक्षा वेगळे असण्याची दखल घेतलेली दिसते. परंतु जंगले नष्ट होण्याने जीवसृष्टीतल्या बर्‍याच प्राण्यांचे अधिवासच नष्ट होतात. त्यांना पोटभर खायला मिळणे मुश्किल झाल्याने अन्न व निवार्‍याच्या शोधार्थ ते शेती व मानवी वस्तीपर्यंत पोचतात. सध्या जंगली जनावरांचे शेतीवरील आक्रमण हा विषय सर्वत्र गाजत आहे. गोव्यात भातशेती, भाजी, नारळ, केळी, काजू, अननस अशा महत्त्वाच्या पिकांचे होणारे नुकसान सहन करणे कठीण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकार दरबारी निवेदने, नुकसान भरपाईसाठी अर्ज, बैठका-सभा अशा प्रयत्नांनंतरही शेतकर्‍यांना मायबाप सरकारकडून दिलासा मिळत नाही. त्यातच सरकारकडून पायाभूत सुविधांच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्याची योजना आखल्याने वन्यजीवांचा शेतीसाठीचा धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसात मोठ्याप्रमाणात मातीची धूप होऊन शेता-भाटांत गाळ साचणे, पाण्याचे स्रोत आटणे असे अनेक धोके शेतीसाठी संभवतात. हे सर्व पाहता, शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी वनांचे महत्त्व अधोरेखित होते.
वनशेती (असीेषेीशीींीू) ही एक महत्त्वाची संकल्पना शेतीच्या शाश्‍वत विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. वनशेती ही शेती उत्पादनातील सुधारीत पद्धत आहे. याचा एकात्मिक पीक व्यवस्थापनाच्या दृष्टीने जगभर गांभीर्याने विचार केला जात आहे. परंतु भारतातील काही भागांत व गोव्यातही ही पीक पद्धती परंपरागत पाहायला मिळते.

शेताच्या बांधावरील वृक्ष, सिंचनविरहित क्षेत्रातील काजू लागवडीत आढळणारी अन्य जंगली वनस्पती, जैवकुंपण (इळेषशपलळपस) ही वनशेतीचीच उदाहरणे आहेत. वनशेतीच्या विविध शास्त्रीय पद्धती पाहिल्यास शेतीच्या शाश्‍वततेसाठी हे किती महत्त्वाचे आहे, याचे आकलन होईल.
१) कृषी वनरोपण ः या पद्धतीत जमिनीच्या प्रकारानुसार आणि झाडांच्या उपयोगानुसार झाडे व पिके एकत्रितरीत्या घेतली जातात. उदा. तटरक्षक, फळझाडे, चारा, लाकूडफाटा इ. झाडांची निवड करून ती योग्य त्या अंतरावर ओळीमध्ये लावून त्यात योग्य पद्धतीने पिके घेतली जातात.
२) वनीय कुरण ः चारा देणारे वृक्ष व कुरण, उपयोगी गवताची लागवड या पद्धतीने केली जाते.
३) कृषी वनीय कुरण ः यात पिके, वृक्ष व गवतांची लागवड केली जाते.
४) उद्यान कुरण पद्धत ः हलक्या प्रतीच्या जमिनीवर रामफळ, सीताफळ, आवळा, काजू यांसारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड करून मधल्या जागेत सुधारीत गवतांची लागवड केली जाते.
५) उद्यान कृषी ः फळझाडांच्या पिकाबरोबर धान्याची पिके घेतली जातात. उदा. भातशेतीच्या बांधावर नारळ, आंबा यांची लागवड.
६) कृषी-उद्यान-कुरण ः मध्यम प्रतीच्या जमिनीत धान्य/भाजीपाला, फळझाडे व सुधारीत गवतांची लागवड केली जाते.
७) वृक्षशेती पद्धत ः या पद्धतीत वृक्षांची लागवड करून फायदा मिळवता येतो. उदा. बांबू, सागवान इ.

अशा या वैविध्यपूर्ण वनशेतीचे अनेक फायदे आहेत. वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबरच वृक्षापासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो व वाढीव उत्पन्न मिळवणे शक्य होते. वृक्षांमुळे शेतात आर्द्रता टिकवली जाते. वादळवारे यांपासून पिकांचे संरक्षण होते. जमिनीची धूप थांबवण्यास मदत होते. या दरम्यान पर्यावरणातील सुधारणेद्वारे हवामानातील प्रतिकूलतेपासून शेतीचे रक्षण होते व माणसाच्या वापरासाठी वनउपजाचा पुरवठाही होतो. वैविध्यपूर्ण वनस्पतींच्या लागवडीमुळे जैवविविधता मूल्य वाढते. या वनीकरणाचा एक महत्त्वाचा लाभ म्हणजे मातीचे संवर्धन. सुपीक मातीचे कृषी उत्पादन वाढीतील महत्त्व सर्वज्ञात आहे. ज्या ठिकाणी असे वनीकरणाचे उपक्रम राबवले जातात, त्या ठिकाणी कृषीविषयक लागवडीसाठी लाभदायक ठरते. वृक्षांमुळे जमिनीवर आच्छादन तयार होते. त्यामुळे पावसाचे थेंब मातीवर पडून मातीची होणारी धूप थांबते. (मध्यम आकाराच्या शहरात उद्याने, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड केल्यास वार्षिक दहा टनापेक्षा जास्त माती धूप होण्यापासून वाचवली जाऊ शकते.) यावरून मातीची होणारी धूप थांबवणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. झाडांचा पालापाचोळा जमिनीवर पडून कुजतो, एक सेंद्रिय आच्छादन यामुळे तयार होते. याचा परिणाम म्हणून जमिनीची सुपीकता वाढते, पाणी वाहून जाण्याचे प्रमाण कमी होऊन पाणी जमिनीत जिरते. या आच्छादनामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

जैववैविध्यामुळे पिकांवर होणारे कीड व रोगांचे प्रादुर्भाव यांना अटकाव होतो. करंज, रुई, निर्गुंडी यांसारख्या वनस्पतींच्या पाल्याचा वापर करून विविध कीटकनाशकांची निर्मिती करता येते. विविध वनस्पती, त्यांचा फुलोरा, फळे यांमुळे विविध पक्षी, परजीवी कीटक अशांची एक अन्नसाखळी तयार होते. त्यामुळेही बरेचसे कीटक व रोग आटोक्यात येतात. पिकातील परागीकरण व फलधारणा सुलभ होते. सकस पीक उत्पादन मिळते.

सेंद्रिय शेती, निसर्गशेतीचा सध्या बोलबाला असल्याने वीषमुक्त अन्नाच्या शोधात बरेच ग्राहक असतात. सकस अन्न न मिळाल्याने व प्रदूषित अन्नाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेतमाल मिळवण्याचा बरेचजण प्रयत्न करतात. पण सेंद्रिय शेती हा शाश्‍वत शेतीचा मार्ग असला पाहिजे. फक्त सेंद्रिय खते वापरून व वीषमुक्त फवारण्या करून उत्पादित केलेला शेतमाल म्हणजे सेंद्रिय शेतमाल एवढा संकुचित विचार उपयोगाचा नाही. त्यासाठी निसर्गसंपदेचा योग्य वापर (दोहन-शोषण नव्हे) करून वनसंपदेच्या साहाय्याने शेती केल्यास बरेच प्रश्‍न निकालात काढता येतील. यासाठी वैयक्तिक प्रयत्नांना सामुहिकतेची जोड देणे आवश्यक आहे.

सामाजिक वनीकरणाचाही विचार यादृष्टीने करता येईल. सामाजिक वनीकरणाचा संदर्भ वनांच्या व्यवस्थापनाशी आणि त्यापासून स्थानिक समुदायाला मिळणार्‍या सुविधा आणि त्यापासून होणार्‍या फायद्याशी आहे. यात वन व्यवस्थापन, वनांचे संरक्षण, उजाड वनक्षेत्रावर वृक्ष लागवड यांचा समावेश होतो. याचा मुख्य उद्देश ग्रामीण, पर्यावरणीय आणि सामाजिक विकास व सुधारणा हा असायला हवा. यात स्थानिक समुदायाच्या गरजा प्राधान्याने लक्षात घेणे आवश्यक आहे. या दरम्यान पर्यावरणातील सुधारणेद्वारे हवामानातील प्रतिकूलतेपासून शेतीचे रक्षण करणे व स्थानिक समुदायाच्या वापरासाठी वनउपज पुरवठा वाढवणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट समोर ठेवणे अपेक्षित आहे. सामाजिक वनीकरणाचे तत्त्व व त्याचा अवलंब शतकानुशतके चालत आला असला