शाळा उघडताच तामिळनाडूत २० विद्यार्थी १० शिक्षक बाधित

0
32

तामिळनाडूमध्ये जवळपास एका वर्षाने १ सप्टेंबरपासून १० आणि १२वीच्या शाळा उघडण्यात आल्या. तर, २ सप्टेंबरपासून इयत्ता ९ वी ते ११ वी साठी शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. या एका आठवड्यात २० विद्यार्थी आणि १० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक बाधित हे चेन्नईच्या एका खासगी शाळेतील आहेत. त्यानंतर शाळेतील इतर १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.