शाळांनी किमान एक अंगणवाडी दत्तक घ्यावी

0
23

>> शिक्षण खात्याचे परिपत्रक जारी

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी किमान एक अंगणवाडी किंवा बालवाडी दत्तक घ्यावी, असे परिपत्रक शिक्षण खात्याने काढले आहे. शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी काढलेल्या पत्रकातून म्हटले आहे की, अंगणवाडीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा प्राप्त व्हाव्यात असे शिक्षण खात्याला वाटत आहे. आणि म्हणूनच खात्याने हे परिपत्रक काढले आहे.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी लहानपणापासूनच त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत व्हायला हवा. विद्यार्थ्यांबरोबरच एकूण समाजाच्याही हिताच्या दृष्टीने ते आवश्यक आहे. आणि म्हणूनच अंगणवाडी किंवा बालवाडींच्या जवळ असलेल्या शैक्षणिक संस्थांनी म्हणजेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी किमान एक अंगणवाडी किंवा बालवाडी दत्तक घ्यावी व त्यात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवाव्यात, असे सदर परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी आपल्या आजूबाजूच्या एका अंगणवाडीची निवड करावी व त्याविषयीची माहिती गुगल फॉर्मवरून ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत कळवावी, असे कळवण्यात आले आहे.