शशी थरुर शुक्रवारी दाखल करणार अर्ज

0
7

कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. तब्बल दोन दशकानंतर कॉंग्रेस पक्षाध्यक्षपद हे गांधी घराण्याबाहेर जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. अशातच खासदार शशी थरूर हे शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली. मिस्त्री यांच्या कार्यालयाला शशी थरूर यांच्या प्रतिनिधींनी ते ३० रोजी सकाळी ११ वाजता अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करतील, असे कळवले आहे.