शरद पवार, अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हे नोंद

0
122

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार व शरद पवार यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेली दोन वर्षे या अनुषंगाने कोणत्याही घडामोडी घडल्या नसताना विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेच ईडीने गुन्हा नोंदवला आहे.
२००५ ते २०१० या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यात अनियमितता आढळली होती. या व्यवहारांची आता ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससह कॉंग्रेस पक्षालाही हा मोठा धक्क ठरणार असल्याची चर्चा आहे.

सदर कर्ज वाटपामुळे सहकारी बँकेचे १० हजार कोटी रुपये नुकसान झाले होते. हा घोटाळा २५ हजार कोटींवर गेला. त्या प्रकरणी अण्णा हजारे यांनी तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. शिवसेनेसह, शेकाप यांच्या बड्या नेत्यांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.