मूळ महाराष्ट्रातील, सध्या करंजाळे येथे राहणार्या एका महिलेला अमेरिकेचा फियान्से व्हिसा मिळवून देण्याच्या बहाण्याने २.६९ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित महिलेने निक्लॉन निक्सन, केनेथ आणि त्रिशा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिलने यूएसए फियान्से व्हिसा मिळवण्यासाठी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून विविध व्यवहारांद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये २.६९ कोटी रुपये जमा केले. अमेरिकन नागरिकाशी विवाह करण्यासाठी हा व्हिसा घेतला जातो. हा व्हिसा घेतल्यानंतर ९० दिवसाच्या आतमध्ये विवाह केला पाहिजे. एकदा विवाहित झाल्यानंतर, व्हिसाधारक विवाहाच्या आधारावर कायम स्वरूपी निवासासाठी (ग्रीन कार्ड) अर्ज करू शकतो.