व्यंगचित्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : केरळ हायकोर्ट

0
9

व्यंगचित्रकार हे प्रेस आणि मीडियाचा अत्यावश्यक भाग आहेत. या संदर्भात भारतीय राज्यघटनेतील कलम 19 (1) (अ) त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकारही देते, असे नमूद करत केरळ हायकोर्टाने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याबद्दल दाखल केलेला खटला फेटाळला. वास्तविक, मलयाला मनोरमाने 70 व्या स्वातंत्र्यदिनी महात्मा गांधी आणि भारतीय ध्वजाचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. भाजप प्रदेश समितीचे सरचिटणीसांनी तक्रार दाखल केली होती.