वेर्णे, काणकोण रस्त्यांसाठी ४७० कोटी रुपये मंजूर : ढवळीकर

0
161

वेर्णे ते लोटली दरम्यानच्या जोड रस्त्यासाठी २७० कोटी रुपये तर काणकोण येथील प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली. साखळी येथील बगल मार्गाचे कामही हाती घेण्याचे मंत्र्यांनी आश्‍वासन दिले. त्यानंतर विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी आपला यासंबंधीचा ठराव मागे घेतला.