वीज खात्यासाठी तब्ब ४८ कोटींच्या कामांना मंजुरी

0
16

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन वीज साधनसुविधांच्या विकासासाठी ४८ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली
आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

थिवी वीज उपकेंद्र आणि तुये पेडणे येथे वीज सुधारणांचा कामाचा समावेश आहे. तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक सुधारणा केली जाणार आहे. त्यात नवीन ट्रान्स्फॉर्मरचा समावेश आहे. कळंगुट, कांदोळी भागातील वीज वितरणात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यात उभारण्यात येणारा तमनार वीज प्रकल्पाचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामात येणार्‍या समस्यांचा आढावा घेण्यासाठी खास बैठक घेण्याची सूचना केली आहे. या वीज प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.