विवाहानंतरच मिळणार लाडली लक्ष्मीचा लाभ

0
6

राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास खात्याच्या लाडली लक्ष्मी योजनेमध्ये एक महत्त्वाची दुरुस्ती करण्यात आली असून, आता लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ विवाहानंतरच दिला जाणार आहे. तसेच, लाभार्थ्यांना या योजनेखालील रकमेचा व्यवसाय, शिक्षणासाठी वापर करायला मिळणार नाही.

महिला आणि बाल विकास खात्याच्या संचालिका दीपाली नाईक यांनी यासंबंधीचा दुरुस्ती सूचना जारी केली आहे. पालकांना मुलीच्या लग्नाच्या वेळी आर्थिक साहाय्य करण्यासाठी लाडली लक्ष्मी ही योजना वर्ष २०१२ मध्ये सुरू करण्यात आली. लाडली लक्ष्मी योजनेचे सुमारे सोळा हजार अर्ज प्रलंबित आहेत.

महिला व बालकल्याण खात्याकडे लाडली लक्ष्मी योजनेसाठी अर्ज सादर केलेल्या लाभार्थ्यांना विवाह नोंदणी दाखला सादर केल्यानंतर योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणार्‍या लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांचे उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये, असेही सूचनेत म्हटले आहे.